पिंपरी, ता. २८ ः पक्ष संघटन सुरळीत चालावे, बळकट व्हावे, त्याचा विस्तार व्हावा, कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जोमाने करावे, यासाठी भारतीय जनता पक्षाने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अनुशासन व शिस्तपालन समितीची नियुक्ती केली आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली.
प्रशासकीय चार वर्षांच्या कार्यकाळानंतर जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली. या घटनेला आठ महिने झाले आहेत. मात्र, पदाधिकारी व नगरसेवकांतील अंतर्गत मतभेद वेळोवेळी अधोरेखित झाले आहेत. अनेकदा सभा तहकूब करण्याची नामुष्की पीठासीन अधिकारी तथा महापौरांवर ओढवली आहे. शिवाय, सभाशास्त्राचे नियमही अनेकदा पायदळी तुडवले गेले आहेत. या सर्व प्रकारांची दखल घेत प्रदेश नेतृत्वाने अनेकदा कारभाऱ्यांचे कान टोचले आहेत. तरीही काही प्रमाणात मतभेद आढळून आले आहेत. यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत आहे. यावर उपाययोजना म्हणून आणि पक्ष संघटना सुरळीत चालावी, संघटनेचा विस्तार व्हावा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शिस्त कायम राहावी, एकवाक्यता राहावी, यासाठी भाजपने शहरस्तरीय अनुशासन समिती स्थापन केली आहे.
समितीमध्ये सहा पदाधिकारी
भाजपच्या अनुशासन समितीमध्ये सदाशिव खाडे, आमदार उमा खापरे, ॲड. मोरेश्वर शेडगे, ॲड. गोरखनाथ झोळ, महापालिका पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विकास डोळस यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.