BJP flex sakal
पुणे

BJP Flex : भाजपकडून शहरभर फ्लेक्‍सबाजी करीत विद्रुपीकरणात भर

भाजपच्या पुण्यातील बैठकीसाठी महत्वाच्या नेत्यांचे आगमन होणार असल्यामुळे पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरात सर्वत्र फ्लेक्‍सबाजी करीत पुन्हा एकदा विद्रुपीकरण करण्यात हातभार लावला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भाजपच्या पुण्यातील बैठकीसाठी महत्वाच्या नेत्यांचे आगमन होणार असल्यामुळे पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरात सर्वत्र फ्लेक्‍सबाजी करीत पुन्हा एकदा विद्रुपीकरण करण्यात हातभार लावला. एकीकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी नियमानुसारच फ्लेक्‍स लावल्याचा दावा केला, प्रत्यक्षात मात्र फ्लेक्‍सबाजीसाठी कुठलीच परवानगी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्य समितीची बैठक बालगंधर्व रंगमंदीर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील नेते या बैठकीसाठी पुण्यात आले होते.

दरम्यान, पक्षाचे वरिष्ठ नेते पुण्यात येणार असल्यामुळे भाजपच्या शहर पातळीवरील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, नगर रस्ता, महापालिका भवन परिसर, विमानतळ परिसर, येरवडा परिसर यासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍सबाजी केली होती.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना फ्लेक्‍सबाबत विचारले असता, त्यांनी महापालिकेची परवानगी घेऊनच फ्लेक्‍स लावण्यात आले आहेत, असे स्पष्ट केले. तर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कुठलीही परवानगी न घेता फ्लेक्‍स लावल्याचे स्पष्ट केले. तसेच फ्लेक्‍सविरुद्ध दंडात्मक कारवाई करुन पुढील कार्यवाही केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT