पुणे

विधानसभा निवडणुकांदरम्यान भाजपला घसघशीत निधी

CD

नवी दिल्ली, ता. ९ (पीटीआय) : देशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान, भाजपच्या केंद्रीय मुख्यालयाला सुमारे एक हजार ४३७ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. तर, काँग्रेसची या राज्यांतील कार्यालये आणि केंद्रातील कार्यालय मिळून या पक्षाला सुमारे २०७ कोटी रुपये मिळाल्याचे काँग्रेसच्या वतीने आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या विवरणपत्रांत संबंधित निधींचे तपशील देण्यात आले असून भाजपला काँग्रेसपेक्षा सातपट अधिक निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांतील निवडणुकांसाठी काँग्रेसने सादर केलेल्या एकत्रित खर्चाच्या विवरणपत्रानुसार, १५ मार्च ते ६ मे या निवडणूक कालावधीत पक्षाला २०७.१७ कोटी रुपयांचा निधी मिळाला तर, निवडणुकीसाठी पक्षाने २४८.५५ कोटी रुपयांचा खर्च झाला.
याउलट, भाजपने याच कालावधीत केवळ आपल्या केंद्रीय मुख्यालयात एक हजार ४७२.८ कोटी रुपये निधी असल्याचे नमूद केले आहे. निवडणूक आयोगाने ही खर्चाची विवरणपत्रे सार्वजनिक केली आहेत.
भाजपने केरळ आणि पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकांशी संबंधित खर्चाची विवरणपत्रे अद्याप सार्वजनिक केलेली नाहीत. त्यामुळे भाजपचा एकूण निधी यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

शिल्लक रकमेतही वाढ
निवडणूक कालावधी संपल्यानंतर भाजपच्या केंद्रीय मुख्यालयातील शिल्लक रकमेतही मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १५ मार्च रोजी ६,७२२.६ कोटी रुपये असलेली शिल्लक ६ मे रोजी ७,६२७.२ कोटी रुपयांवर पोहोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT