Murlidhar Mohol Girish Bapat Sakal
पुणे

Girish Bapat : लोकसभेसाठी पुण्यातून गिरीश बापटांचा पत्ता कट? वाचा सविस्तर

दत्ता लवांडे

पुणे : भारतीय जनता पक्षाने गुरूवारी प्रदेश सरचिटणीस पदांच्या नियुक्त्या केल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील पाच नेत्यांचा सामावेश आहे. पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मुरलीधर मोहोळ यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांच्यापेक्षा जेष्ठ असणाऱ्या खासदार गिरीश बापट यांचे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तिकीट कटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (गुरूवार, ता. १५) पाच जणांची प्रदेश सरचिटणीसदपी नियुक्ती केली. त्यामध्ये ठाण्यातून अॅड. माधवी नाईक, रायगडमधून विक्रांत पाटील, अकोल्यातून रणधीर सावरकर, संभाजीनगरमधून संजय केणेकर आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुण्यातून जेष्ठ नेते गिरीश बापट यांचे पक्षातील महत्त्व कमी झालंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गिरीश बापट हे पुण्यातील भाजपचे जेष्ठ नेते असून ते लोकसभा सदस्य आहेत. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी त्यांनी सध्या चाललेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली होती. यावेळी आपण आपल्या पक्षावरही नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश सरचिटणीसांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

"सध्याच्या राजकारण्यांनी कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता कामं करायला हवीत पण सध्याचे राजकारणी विनाकारण खर्च करतात, जेवन देतात, फ्लेक्स लावतात पण कामं काहीच करत नाहीत. आम्ही एवढ्या वर्षात नि:स्वार्थपणे काम केले पण कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही. त्यामुळे मी सध्या माझ्या पक्षांसह सर्वांवरच नाराज आहे. पण हे माझं व्यक्तिगत मत आहे" असं बापट यांनी बोलताना म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचे आता पक्षातील महत्त्व कमी झालंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकांपासून खासदार गिरीश बापट हे आजारी असल्याचं चित्र आहे. अनेक दिवसांपासून ते आजारी असल्यामुळे सक्रिय राजकारणात ते जास्त सहभागी राहत नसल्याचं चित्र असून त्यांना आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तिकीट देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर गिरीश बापट यांच्या जागी लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागणार का हेही पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

ED Raid Coal Mafia : देशातील मोठ्या कोळसा माफियावर ईडीची छापेमारी; ६०० कोटींची मालमत्ता, १६० कोटींचा म्युच्युअल फंड गोठवला

SCROLL FOR NEXT