पुणे

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव : सुप्रिया सुळे

सकाळवृत्तसेवा

इंदापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. मात्र, आता संविधान बदलण्याचा डाव भाजप सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 'संविधान बचाव रॅली'चे आयोजन करण्यात आले, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

14 नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील वाॅर्डनिहाय अडचणी जाणून घेण्यासाठी व नागरिकांच्या भेटीगाठीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दौऱ्याचे आयोजन केले होते. शहरातील सरस्वतीनगर, नामदेव मंदिर व पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील इत्यादी प्रमुख उपस्थित होते. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात 29 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली महिलांची 'संविधान बचाव रॅली' काढण्यात आली होती.

केंद्रातील भाजप सरकारने संविधानात बदल करण्याचा डाव आखला. त्यासाठी 'संविधान बचाव रॅली' काढण्यात आली. प्रत्येक तालुक्यातील ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात येणार आहे. त्याकरीता जागा हवी आहे. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.

इंदापूर नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता असल्याने विरोधक राष्ट्रवादी नगरसेवकांची कामेच केली जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर गाडे यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. बारामती लोकसभा मतदार संघातील कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यात आली असून, इंदापूर नगरपरिषद हद्दीतील अनेक दिवसांपासून ताटकळत पडलेला भार्गवराम बगीचा शुशोभीकरण व टाऊन हाॅलच्या कामाचा प्रश्न लवकरच आपण मार्गी लावणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT