BJP Harshvardhan Patil will not contest election sakal
पुणे

Pune : शेतकऱ्यांच्या हितासाठी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवणार नाही - हर्षवर्धन पाटील

इंदापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लढवणार नसल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली

संतोष आटोळे

इंदापूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लढवणार नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते यावेळी भारतीय जनता पक्ष तालुकाध्यक्ष शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, लालासाहेब पवार, विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील,मेघशाम पाटील, अशोक इजगुडे, वैभव देवडे, किरण पाटील, तेजस देवकाते आदी यांच्यासह अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पा\टील म्हणाले, बाजार समिती बिनविरोध करण्याची आमची भूमिका असतानाही आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही यामुळे भाजपाच्या वतीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही पाटील यांनी सांगितले.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव पाटील यांनी शेतकरी हिताचा विचार करून ही संस्था चालवली. त्यानंतरच्या काळात 2019 पासून तालुक्यातील विविध सहकारी संस्था बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र ज्यांच्या ताब्यात सत्ता आहे त्यानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. यामुळे शेतकरी हिताचा विचार कर

ता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळख असलेल्या बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. तसेच यापूर्वी तालुक्यातील विविध सहकारी संस्था बिनविरोध होण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT