Pune News 
पुणे

Video: पुण्यात गणपती देखाव्याच्या कळसाला आग; भाजपाध्यक्ष नड्डांच्या हस्ते आरती सुरु असताना घडला प्रकार

अंबिलओढा कॉलनी परिसरातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या देखाव्याला ही आग लागली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पुण्यातील अंबिलओढा कॉलनी परिसरातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणेश देखाव्याच्या कळसाला आग लागल्याचं वृत्त आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आरती सुरु असताना हा प्रकार घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. (BJP J P Nadda Dhiraj Ghate Sane Guruji Tarun Mitra Mandal Ganapati Mandal catches fire)

भाजप शहराध्यक्षांचं मंडळ

साने गुरुजी तरुण मंडळ हे पुण्यातील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचं मंडळ आहे. यंदा या मंडळानं उज्जैन येथील महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते इथल्या गणेशाच्या आरतीचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार आरती सुरु असतानाच अचानक मंगळवारी संध्याकाळी हा आगीचा प्रकार घडला. पुढील गोंधळ टाळण्यासाठी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर पडावं लागलं. (Latest Marathi News)

फटाक्यांमुळं लागली आग

नड्डांच्या स्वागतासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आकाशात फटाके उडवले हे फटाके देखाव्याच्या कळसाला लागले आणि त्यामुळं तिथं पेट घेतल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एक वाॅटर टँकर ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत देखाव्याचं नुकसानं झालं पण कुणीही जखमी झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT