नवी दिल्ली, ता. १३ (पीटीआय) : ‘‘भगवान श्रीरामांचे नाव घेत गरीबांचे हक्क हिरावून घेणे, हाच भाजपच्या खऱ्या कार्यपद्धतीचा भाग आहे,’’ असे म्हणत, व्हीबी-जी राम जी योजनेतील हजेरी नोंदविण्याच्या प्रक्रियेत कथित गैरव्यवहार झाल्याच्या वृत्तावरून काँग्रेसने मंगळवारी भाजपवर जोरदार टीका केली.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे माध्यम प्रभारी जयराम रमेश यांनी एक वृत्त ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा अर्थात ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत गैरव्यवहाराची एक पद्धत उघड झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. अधिकृत राष्ट्रीय मोबाइल मॉनिटरिंग प्रणाली (एनएमएमएस) ॲपसारखे दिसणारे बनावट ॲप वापरून मोबाइलमध्ये आधीपासून साठवलेल्या छायाचित्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर मजुरांची हजेरी नोंदविली जात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “पहिल्यांदा भगवान श्रीरामांच्या नावाने गोळा केलेल्या देणग्यांची चोरी; त्यानंतर मनरेगाअंतर्गत १०० दिवसांच्या रोजगाराच्या हक्कावर हल्ला; आणि आता ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत बनावट हजेरी नोंदींच्या माध्यमातून गरिबांची सरकारच्या संरक्षणाखाली लूट करण्यात येत आहे. भगवान श्रीरामांचे नाव घेत गरिबांवर घाला घालत आणि त्यांचा रोजगाराचा हक्क हिरावून घेतला जात आहे. हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर श्रद्धेशी केलेली प्रतारणा आणि गरिबांच्या हक्कांची चोरी आहे. हे सर्व भक्ती आणि रोजगाराच्या नावाखाली सुरू आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.