कोलकता, ता. ८ (पीटीआय) ः पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय साहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणात बांगलादेशातील शार्पशूटर सहभागी झाले असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यापार्श्वभूमीवर सीमेवरील पोलिसठाण्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, येथे मोठ्याप्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
रथ यांच्या हत्याप्रकरणात स्थानिक गुंडांच्या टोळ्यांनी मारेकऱ्यांना मदत केल्याची शक्यताही व्यक्त केली जात असून, त्या अनुषंगानेही पोलिस तपास करत आहेत. रथ यांच्या हत्येला दोन दिवस उलटूनही शुक्रवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. ‘‘या प्रकरणात सखोल तपास सुरू असून, ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे, ते पाहता मारेकरी हे सराईत असल्याचे दिसून येत आहे,’’ असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटिव्ही चित्रण तपासले असून, मारेकरी हल्ला करण्यापूर्वी बराच काळ रथ यांच्या मोटारीचा पाठलाग करत असल्याचे उघड झाले आहे, असेही पोलिसांनी सांगितले. मध्यमग्राम परिसरातही मोठ्याप्रमाणावर तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.