Sunil Kamble: Esakal
पुणे

Sunil Kamble: आमदार सुनील कांबळेंना झालंय काय? आधी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कानशिलात, नंतर ड्युटीवरच्या पोलिसाला मारहाण

Sunil Kamble: सकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अन् आता ड्युटीवर असलेल्या पोलिस आधिकाऱ्याला भाजप आमदार सुनील कांबळेंची मारहाण केल्याने ते चर्चेत आले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. आज सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ससून रुग्णालयात घडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला होता, त्यावेळी ही घटना घडली आहे.

शिवाजी सरक असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आमदार सुनील कांबळे यांनी मंचावरून खाली उतरत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. पोलिस कर्मचारी हे सुरक्षा आणि त्यांचे काम बजावत असताना कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला कानशिल लावली, या प्रकारामुळे सर्वजण आवाक झाले. दरम्यान सुनील कांबळे यांनी केलेली मारहाणीची दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.

सुनील कांबळे यांनी आज सकाळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती. उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले असे विचारत त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली होती. राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती.

तर, अजित पवार यांच्या उपस्थितीत जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा कांबळे हे मंचावरून खाली उतरत असताना त्यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना कानाखाली लगावली. पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी त्यांचे काम करत असताना कांबळे यांना अचानक राग अनावर झाला, त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. भाजप नेत्याच्या या वर्तणुकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यास सुनील कांबळे यांनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT