girish bapat 
पुणे

पुण्यात संचारबंदीसह पीएमपी बंदला भाजपचा विरोध

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पुढचे सात दिवस पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू राहतील. याची अंमलबजावणी 2 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून होणार आहे. दरम्यान, पुण्यात पीएमपी बंद करण्याच्या निर्णयाचा भाजपने विरोध केला आहे. लॉकडाऊन नकोच अशी भूमिका असलेल्या भाजपने आता निर्बंधांमध्ये वाढ केल्यानंतर विरोध दर्शवला आहे. भाजप खासदार गिरीष बापट यांनी संचारबंदी नको तर जमावबंदी लागू करा असं म्हटलं आहे.

पुण्यात संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत पुढील सात दिवस संचारबंदी लागू राहणार आहे. तसंच हॉटेल्स, मॉल, थिएटर्स आणि पीएमपी बससेवा सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. पुण्यात नवे निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. पीएमपी बंद करू नये असं म्हणत त्यांनी कंपन्यांशी बोलून गाडीची व्यवस्था करण्यात यावी असं म्हटलं आहे. तसंच बाहेर जाणाऱ्या कामगारांना प्राधान्य द्या. वयस्क लोकांना प्राधान्य द्या अशी मागणी त्यांनी केली. संचारबंदी नको तर जमावबंदीचे आदेश द्या अशी मागणी त्यांनी केलीय. बससेवा बंद झाल्यास कामगारांचे हाल होतील असं म्हणत पुण्यातील कडक निर्बंधांना भाजपने विरोध केला आहे. 

काय राहणार बंद 
हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट
मॉल्स, सिनेमागृह
धार्मिक स्थळे, मंदिर
पीएमपी बस सेवा
संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी
राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी
आधीच्या नियमानुसार शाळा, कॉलेज बंदच

काय सुरु?
हॉटेलची पार्सल सेवा 
अत्यावश्यक सेवा
भाजीपाला, फळे, दूध
अंत्यविधीला 20 लोकांची उपस्थिती
लग्न सोहळ्याला 50 जणांची उपस्थिती
​आधी ठरलेल्या लग्नसोहळ्यांनाच परवानगी
दहावी बारावीच्या परीक्षा

खासगी कार्यालयांमधून संचारबंदीच्या काळात घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबत पत्र दिले, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार माहिती सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT