पुणे

उच्चशिक्षित भाजपच्या चेताली मुळे यांना नान्नजच्या एकजुटीने तारले

CD

लोगो : नान्नज जि.प. गट
---
वडाळा (ता. उ. सोलापूर) : निवडून आल्यानंतर चैताली मुळे यांना उचलून आनंद व्यक्त करताना त्यांचे पती श्रीकांत मुळे.
---
भाजपने केला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
उत्तर सोलापूरमध्ये भाजपची मुसंडी; ताळमेळाअभावी राष्ट्रवादीला फटका
दयानंद कुंभार : सकाळ वृत्तसेवा
वडाळा, ता. १२ : उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नान्नज जिल्हा परिषद गट यावेळी मात्र भाजपने उद्ध्वस्त केला आहे.
यामध्ये नान्नज जिल्हा परिषद गटात एकसंध असणाऱ्या भाजपने मुसंडी मारली तर राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला.
नान्नज जि.प. गटात भाजपच्या चैताली मुळे, नान्नज पंचायत समिती गणात सुनील भोसले यांनी विजय मिळवला तर वडाळा गणात राष्ट्रवादीच्या वैशाली शीलवंत या विजयी झाल्या आहेत. माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाने तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली. माने समर्थक असणारे श्रीकांत मुळे यांच्या पत्नी चैताली मुळे यांना भाजपने उमेदवारी दिली. भाजपने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली. राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी दडे, भाजप जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष विनायक सुतार यांनी भाजप एकसंध ठेवत राष्ट्रवादीला धोबीपछाड केले. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अनिल माळी, नान्नज पंचायत समितीचे उमेदवार प्रकाश चोरेकर यांच्यात प्रचार यंत्रणे दरम्यान नसणारा ताळमेळ, नान्नज गटात राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे तालुका स्तरावरील पक्ष संघटनेकडून झालेला कानाडोळा याचा राष्ट्रवादीला फटका बसला.
नान्नजच्या श्रीकांत मुळे यांनी ‘माणुसकी फाउंडेशन’ अंतर्गत केलेल्या विधायक कामांचा फायदा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार चैताली मुळे यांना झाला.
तसेच राष्ट्रवादीकडे असणाऱ्या नान्नजच्या सरपंचपदावर काही काळानंतर इतर इच्छुकांना संधी देण्याचे ठरले होते. मात्र राष्ट्रवादीने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी साथ सोडली होती. त्याचा फटका नान्नजमध्ये राष्ट्रवादीला बसला.
तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळिराम साठे यांच्या वडाळा गावातच भाजपकडून विरोधी गटाला मिळालेली ताकद, यामुळे वडाळ्यातही भाजपच्या उमेदवाराने एक हजाराचा आकडा पार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक क्षीरसागर हे जिल्हा परिषदेसाठी उभे होते. त्यांनी नान्नज गटात १७९४ मते घेतली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल माळी यांना काही अंशी फटका बसला.
नान्नज पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश चोरेकर यांनी आपल्या नान्नज गावातच प्रचारावर मोठ्या प्रमाणात भर दिला. याउलट रानमसले येथे त्यांनी पदयात्रा वगळता प्रचारासाठी तसदी घेतलीच नाही. त्यामुळे त्यांची पीछेहाट पराभवाकडे घेऊन गेली. ‘तुतारी’ चिन्हावर उभे असलेले रानमसलेचे स्थानिक उमेदवार सत्यवान गरड हे ११०८ मते घेत आघाडीवर राहिले.
वडाळा पंचायत समितीसाठी तिरंगी लढत झाली. यामध्ये प्रमुख लढत राष्ट्रवादी व भाजपमध्ये झाली. तिन्ही उमेदवार कळमण गावातीलच होते. येथे स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष न घालण्याच्या अटीवर वैशाली शीलवंत यांनी बाजी मारली. यामुळे येथे शिल्पा गणेश माळी यांची ४०० मतांनी पीछेहाट झाली. तसेच राष्ट्रवादीच्या वैशाली शीलवंत यांनी कळमणमधील ४०० तर वडाळ्यात ४६२ मतांच्या आघाडीच्या जोरावर भाजपच्या शिल्पा माळी यांच्यावर ४९१ मतांनी विजय संपादन केला.
---
चौकट
नान्नज अन्‌ वडाळ्यातूनच राष्ट्रवादीचा गेम
नान्नजच्या स्थानिक भाजपच्या उमेदवार चैताली मुळे यांना नान्नजकरांनी ३३८९ इतके भरभरून मतदान केले. येथे राष्ट्रवादीला केवळ १०६९ मते मिळाली. राष्ट्रवादीचे वडाळ्यातील स्थानिक उमेदवार अनिल माळी यांना गावातून अपेक्षित साथ लाभली नाही. उलट भाजपच्या चैताली मुळे यांनी वडाळ्यात १०५० मते मिळवली. भाजपच्या मुळे यांना मिळालेल्या एकूण मतांपैकी नान्नज व वडाळ्यात या दोन्ही गावांतूनच जवळपास निम्मी मते घेतली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल माळी यांचा नान्नज, वडाळ्यातूनच गेम
झाला.
---
चौकट
रानमसलेत भाजप अन्‌ राष्ट्रवादीला मतांचा फटका
रानमसले येथील सत्यवान गरड तुतारीच्या चिन्हावर नान्नज पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत होते. येथे क्रॉस व्होटिंगच्या नादात जिल्हा परिषद गटासाठी उभे असलेले दीपक क्षीरसागर यांच्या तुतारी चिन्हाला रानमसलेतून ४९६ मते मिळाली. याचा फटका भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT