पुणे

विरोधाची धार

CD

चार आमदारांचा सत्कार, त्यातही विरोधाची धार
भाजपतर्फे नागरी सत्कार ः नेत्यांकडून एकमेकांना कोपरखळ्या
अहिल्यानगर, ता. २६ ः भाजपने नवनिर्वाचित आमदार सुनील कर्जतकर, प्राजक्त तनपुरे, विवेक कोल्हे व अक्षय कर्डिले यांचा आज नागरी सत्कार केला. पक्षाने केलेल्या या सत्कारातही टक्के टोणपे आणि कोपरखळ्याही पहायला मिळाल्या. कुणी विरोधाची धार तीव्र करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. जिल्ह्यातील आमदार मोनिका राजळे वगळता सर्व महायुतीचे आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर अक्षय कर्डिले निवडून आले. तेथे उमेदवारी देण्यावरून बरीच चर्चा झाली होती. प्रारंभी या मतदारसंघात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर अक्षय यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.
अक्षय यांनी सत्कारादरम्यान मदत करणाऱ्या पक्षांतील सर्वांचेच आभार मानले. परंतु पूर्वीचे विरोधक प्राजक्त तनपुरे ऐनवेळी थांबल्याचे सांगत त्यांचाही नामोल्लेख केला. मात्र, हे ऐकण्यासाठी तनपुरे व्यासपीठावर उपस्थित नव्हते. ते आजारी असल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तनपुरे यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा काढला. त्यांना भाजपमध्ये ऑकवर्ड वाटत असल्याचे जाहीरपणे सांगितले. नाराज असाल तरी आता काही उपयोग नाही. ॲडजस्ट करावेच लागेल, असे सांगितले. यामुळे पक्षांतर्गत बाब चव्हाट्यावर आली.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय मतभेद दृढ होत असल्याचे दिसते आहे. एकमेकांविरोधात त्यांची टीका टिप्पणी सुरू आहे. विधान परिषदेवर विवेक कोल्हे आमदार म्हणून निवडून आले आहेत, तरीही त्या निवडणुकीदरम्यान घडलेले नाट्य वारंवार उफाळून येत आहे. आजही कोल्हे यांनी डॉ. विखे यांच्या विधानाचा मुद्दा उकरून काढला. त्यांनी माझ्यासाठी थांबून त्याग केला, असे त्यांचे म्हणणे आहे. हे मीडियातूनच मला कळलं, असे म्हणत टोमणा मारला.
----------
मित्र पक्षाचे नव्हे आमचेच
आमदार कर्जतकर यांनी सर्व नूतन आमदार तरुण आहेत. ही भाजप आहे. इथे पाणी सारखं वाहत असतं. त्यामुळे डबकं होत नाही, असे सांगत पक्षाची ध्येयधोरणे सांगितली. महायुतीत राज्यात धुसफूस दिसते. इथे मात्र आम्ही गुण्यागोविंदाने नांदतो. लंघे तर आमचेच आहेत. अमोल आणि मी सोबत काम केले आहे. दातेंचा प्रश्‍नच नाही. संग्राम भैया राष्ट्रवादीचे असले, तरी आमच्यातून वेगळे कोण समजेल.
...........
जय श्रीरामचा नारा
आमदार अक्षय कर्डिले आपल्याला आमदार करण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे सांगत होते. आमदार संग्राम भैया यांचे नाव घेताच सभागृहातून जय श्रीरामचा जय घोष झाला. त्यावेळी अक्षय यांनी थांबत भैयांमुळे हिंदुत्व सर्वदूर पसरले आहे. त्यांचे नाव संग्रामभैयाऐवजी जयश्री रामच ठेवू. यावर पुन्हा जय श्रीरामचा जयघोष झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

Raigad Safety Row: कुंभे धबधब्यातील प्रतिबंधित सुळक्याचे रील एमटीडीसीच्या पेजवर

Pulse Polio : मुळशीसह पुणे जिल्ह्यात २८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला ‘दोन थेंब जीवनाचे’ देण्याचे आवाहन

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT