पुणे

ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात भाजपाचे 'आक्रोश आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सागर आव्हाड

पुणे: ''आरक्षण आमच्या हक्काचं'', ''उठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो'','' ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान में'' अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे आंदाेलन करण्यात आले. (BJP OBC Morcha Akrosh Andolan in Pune for OBC reservation)

महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरतर्फे आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणा-या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसींना मिळणारे अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यास अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षणाबाबतही तीच स्थिती झाली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन काही नेतेमंडळी महाराष्ट्रातील जनतेची धूळफेक करीत आहेत. मात्र, ओबीसी समाज त्यांच्या या धोरणांना चांगलेच ओळखून आहे. त्यामुळे आता यापुढे ओबीसी समाज शांत बसणार नाही. महाविकास आघाडी, ठाकरे सरकारने जनतेची दिशाभूल केली असून त्याविरोधात भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चा आक्रोश आंदोलन करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT