भाजप समविचारीची कपबशी,
मोहिते-पाटील पॅनेलला शिट्टी
जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणूक : पणन, दुग्ध, नागरी बँक मतदारसंघांत चुरस
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सहकार विकास पॅनेलला आणि त्यांच्या समविचारी गटातील उमेदवारांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलला शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. डीसीसीसाठी कपबशी विरुद्ध शिट्टी असा प्रमुख राजकीय सामना रंगणार आहे. अर्ज माघारीनंतर आज निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी व चिन्हवाटप निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले आहे.
काही उमेदवारांना ट्रॅक्टर, खटारा, सफरचंद आणि बॅटरी यांसारखी चिन्हेही मिळाली आहेत. त्यामुळे प्रमुख दोन पॅनेलच्या चिन्हांसोबतच अपक्ष आणि अन्य उमेदवारांची चिन्हेही मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहेत. जिल्हा बँकेच्या सत्तेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने सहकार विकास पॅनेलच्या माध्यमातून ताकद पणाला लावली आहे. दुसरीकडे मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलच्या माध्यमातून भाजपला आव्हान दिले आहे. बँकेच्या १९ पैकी १० जागा बिनविरोध झाल्यानंतर आता उर्वरित ९ जागांसाठीची लढत होणार आहे.
चौकट...
मतदारसंघ, उमेदवार व त्यांना मिळालेले चिन्ह
- माळशिरस सोसायटी मतदारसंघ : शहाजीराव देशमुख (कपबशी), ज्ञानराज पाटील (ट्रॅक्टर), अर्जुनसिंह मोहिते-पाटील (शिट्टी)
- सांगोला सोसायटी मतदारसंघ : संजय इंगोले (खटारा), बाबासाहेब देशमुख (कपबशी)
- महिला मतदारसंघ (२ जागा) : शामल बागल व अर्चना घाडगे (कपबशी), अस्मिता गायकवाड व सिंधू पाटील (शिट्टी), नीता गुंड (बॅटरी), रुक्मिणी रणदिवे (सफरचंद)
- अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ : महादेव कांबळे (कपबशी), दत्तात्रय खडतरे (शिट्टी)
- विमुक्त जाती/भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ : श्रीधर कोंडले (छत्री), अनिकेत देशमुख (शिट्टी), राजेंद्र बंदिछोडे (कपबशी)
- पणन, प्रक्रिया संस्था मतदारसंघ : संग्रामसिंह जहागिरदार (शिट्टी), रणजित शिंदे (कपबशी)
- दुग्ध संस्था/व्यक्ती सभासद मतदारसंघ : शिवाजी पाटील (शिट्टी), सूर्यादित्य साळुंखे (कपबशी)
- नागरी बँका/पतसंस्था मतदारसंघ : श्रीधर कोंडले (छत्री), राजेंद्र गंगदे (नारळ), मनीष देशमुख (कपबशी), अमोल शिंदे (शिट्टी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.