BJP sakal
पुणे

पुणे : प्रशासकांच्या समोर वाचला भाजपने तक्रारींचा पाढा

महापालिकेची मुदत संपल्याने गेल्या दीड महिन्यापासून प्रशासक म्हणून विक्रम कुमार हे काम पाहात आहेत.

​ ब्रिजमोहन पाटील

महापालिकेची मुदत संपल्याने गेल्या दीड महिन्यापासून प्रशासक म्हणून विक्रम कुमार हे काम पाहात आहेत.

पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेल्याच आठवड्यात महापालिका बरखास्त झाली तरी महापालिकेत जात रहा, नागरिकांचे प्रश्‍न मांडा, तुम्ही नगरसेवक आहात असेच समजा आणि काम करा असे आदेश दिलेला असताना आज (ता. २) भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. शहरातील खड्डे, डासांचा त्रास, पाणी टंचाई यासह इतर प्रश्‍नांवर तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर आयुक्तांनी सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे आश्‍वासन दिले.

महापालिकेची मुदत संपल्याने गेल्या दीड महिन्यापासून प्रशासक म्हणून विक्रम कुमार हे काम पाहात आहेत. गेले पाच वर्ष महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने आज शहरातील समस्या मांडून त्याकडे प्रशासकाचे लक्ष वेधले. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, दत्ता खाडे, दीपक पोटे, गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत जगदीश मुळीक म्हणाले, ‘महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याने नागरिकांच्या समस्या मांडण्याचे नगरसेवकांचे व्यासपीठ असलेली सर्वसाधारण सभा होत नाही. यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नांना वाचा फुटत नसल्याने आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. मुळामुठा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या विविध भागात रस्ते खोदले आहेत. शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मिळकत करात भरमसाट वाढ झाल्याची नागरिकांची तक्रार आहे हे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

आयुक्तांनी या समस्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. नव्याने रस्ते खोदाई करू नये व ३१ मे पर्यंत शहरातील रस्ते पुर्ववत करण्यात येतील. वेगाने जलपर्णी काढण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे डासांचा त्रास कमी होईल असे आश्‍वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT