पुणे

‘सोमेश्‍वर’च्या निवडणुकीत भाजप स्वतंत्र पॅनेल करणार

CD

सोमेश्वरनगर, ता. ८ : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा संपूर्ण ताकदीने लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी मेळाव्यात आली असून, त्या दृष्टीने पूर्ण तयारी सुरू केली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू झाली आहे. गतनिवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप पुरस्कृत अशा लढतीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने भाजप पुरस्कृत पॅनेलला चारीमुंड्या चीत केले होते. आताच्या निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे यांच्यामुळे भाजपची ताकद पुरंदर तालुक्यात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा कार्यकर्ता मेळावा सोमवारी सायंकाळी निंबूत (ता. बारामती) येथे झाला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, संजय जगताप, अशोक टेकवडे, माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, पुणे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, शेखर वढणे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे, डॉ. नितीन सावंत आदी उपस्थित होते. या मेळाव्यात नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतला. काही वाद-प्रतिवादही झाले. यानंतर अखेरीस सोमेश्वर कारखान्यात स्वतंत्र पॅनेल टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना या तिघांपाठोपाठ भाजपनेही स्वतंत्र पॅनेल करण्याची घोषणा केली आहे. यामुळे लढत नेमकी किती गटांमध्ये होणार आणि कुणाकडे कितपत बळ आहे, याच्या सभासदांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
याबाबत शेखर वढणे म्हणाले, ‘‘भाजपची ताकद वाढली आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार मेळावा घेतला. यामध्ये कार्यकर्त्यांनी निवडणुकीत ताकदीने उतरण्याची मागणी केली. त्यानुसार आम्ही पॅनेल टाकणार आहोत. शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करणार आहोत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एकोप्याने पुढे जाण्याचे आवाहन केले असले, तरी याबाबत अद्याप माझ्यापर्यंत कुठलीही चर्चा आली नाही. आमच्या वरिष्ठ पातळीवर काही निर्णय घेतील ते पाहता येईल पण आता तरी आम्ही ताकदीने तयारी करत आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्चा तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पार...

Pune News : दहीहंडीत नियमांचे उल्लंघन; आणखी नऊ गुन्हे दाखल; मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांचा समावेश

Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

Dancer Aishwarya Jadhav : अश्लील नृत्याला परवानगी देऊ नका; मात्र कलेचा आदर करणाऱ्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT