Chandrakant Patil Sakal
पुणे

"तुझे बाबा जर मला..." चंद्रकांत पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याचसोबत त्यांनी आदित्य ठाकरेंचेही कान टोचण्याचा प्रयत्न केला. (Chandrakant Patil holds press conference in pune)

उद्धव ठाकरे यांनी काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि अन्य विरोधकांवर टीका केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. फ्रस्ट्रेशन व्यक्त करताना ही भाषा योग्य नाही, असं ते म्हणालेय. ठाकरे यांचा थैयथयाट सुरू आहे. त्यांच्या सगळ्या भाषणात ठोकेन, मारेन, तोडेन, सोडणार नाही वगैरे शब्द वापरत असतात. ही सर्व भाषणं सारखीच आहेत. (Chandrakant Patil taunts aditya thackeray)

पंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेची स्थिती विचार करायला लावणारी आहे. पक्षाचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हातपाय मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. राज्यातील 43 नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

"अरे तुझे बाबा..."

राज्यातील भाजपचे नेते काही ना काही कारणांवरून राज्यपालांना भेटत असतात. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला होता. राज्यपालांचं घर हे भाजप नेत्यांचा अड्डा झाला आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंने केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. प्रताप सरनाईकांच्या प्रकरणात आम्ही राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अरे.. तुझे बाबा म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री भाजपच्या अध्यक्षालाही भेटायला तयार नाहीत. राज्याचे सर्वाधिक घटनात्मक पद राज्यपाल आहे. तुम्ही उपलब्ध नसल्याने हे पाऊल उचलावं लागतं, असं पाटील म्हणाले.

२७ तारखेनंतर त्यांचा माझा एकदा फोन आला. वाढदिवसाला, कार्यक्रमांना कधी फोन त्यांनी घेतला नाही. आम्ही त्यांच्या आजारपणाबद्दल चौकशी केली, तरी ते उपलब्ध नव्हते. अधिकृत फोन केले, वेळ मागितली. आजारपणात कॉल केले, वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. मात्र ते काही फोन उचलत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नाना पटोलेंची शारीरिक तपासणी करा

सध्या नाना पटोले त्यांच्या मोदींवरील वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मी मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोलत होतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मात्र, यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. राज्यात ठिकठिकाणी पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर त्यांची टेस्ट करावी, आणि मानसिक तपासणीत गोष्टी स्पष्ट होतीस, असं पाटील यांनी सुचवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

SCROLL FOR NEXT