पुणे

कोपर्डे हवेली : आमदार मनोज घोरपडे यांचा प्रचार दौरा

CD

कोपर्डे हवेली गटात भाजपला साथ द्या

आमदार मनोज घोरपडे यांचा प्रचार; अन्‍यायाच्‍या थापांना भुलू नका

कोपर्डे हवेली, ता. ३ : कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराने जोरदार झंझावात निर्माण झाला आहे. अंतवडी (ता. कऱ्हाड) येथे आयोजित कोपरा सभेत त्यांनी उमेदवार जिल्हा परिषदेच्या स्वाती चव्हाण, पंचायत समिती गणाचे दत्तात्रय शेलार आणि अनिता वेताळ यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.
सभेत बोलताना घोरपडे म्हणाले, “अंतवडी गावाला गेल्या पंचवीस वर्षांपासून पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले. माजी सहकारमंत्र्यांच्या वडिलांनी पाहिलेले हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे स्वप्न आम्ही पूर्ण केले. जनतेला सतत दुष्काळात ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले.”
पुढे ते म्हणाले, “काही लोक येतील आणि भावनिक होऊन ‘माझ्यावर अन्याय झाला’ असे सांगतील. त्यांना भुलू नका. स्वाती चव्हाण, दत्तात्रय शेलार आणि अनिता वेताळ या उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून देऊन परिसराच्या सर्वांगीण विकासाला पाठिंबा द्या.”
आमदार घोरपडे यांनी वडोली निळेश्वर, अंतवडी, रिसवड, शामगाव आणि करवडी या गावांमध्ये घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
प्रचार दौऱ्यात माजी सरपंच शिवाजीराव शिंदे, हिंदकेसरी संतोष वेताळ, महेश चव्हाण, निवास थोरात, शैलेश चव्हाण, स्वाती चव्हाण, अनिता वेताळ, कोयना दूध संघाचे चेअरमन संपतराव इंगवले, सतीश वेताळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

फोटो :........KRH26B02374
कोपर्डे हवेली : प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना आमदार मनोज घोरपडे. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)

.......................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT