chandrkat patil sakal
पुणे

छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे: मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २६ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजपचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.

पाटील म्हणाले, ‘‘ जे ओबीसींना ते मराठा समाजाला, हे सूत्र वापरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. परंतु महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गमावले. मराठा समाजासाठी भाजप सरकारने सुरू केलेल्या योजनांची अंमलबजावणी होत नाही.’’

मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरु केली. मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींची निम्मे शुल्क भरण्यासाठी ७८५ कोटी रुपये खर्च केले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक- युवतींना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी दहा लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली. मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृहे सुरू केली परंतु ती बंद असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT