पदवीधर, शिक्षकमध्ये भाजपचाच विजय
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण; कऱ्हाडमध्ये मतदारांशी साधला संवाद
कऱ्हाड, ता. १२ ः पुणे पदवीधरमध्ये भाजपच्या डॉ. स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यामुळे त्यांचा भरघोस मतांनी विजय होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे मतदार संवाद कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, शिक्षकचे उमेदवार कौस्तुभ गावडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत भाजपचे उमेदवार महायुतीच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. या निवडणुकीत मतदार नोंदणीला विशेष महत्त्व आहे. भाजपने नोंदणीसह प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले आहे. डॉ. स्मिता जाधव पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे मतदारांनी दोन्ही उमेदवारांना प्रथम पसंतीची मते द्यावीत.’’ खासदार उदयनराजे, मंत्री गोरे, आमदार डॉ. भोसले यांची भाषणे झाली. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
.............
चौकट
...........
भाजपला द्या संधी ः उदयनराजे
लोकशाहीमध्ये मतदार सर्वोच्च आहेत. त्यांचा कौलच उमेदवारांचे भवितव्य ठरवतो. भाजपने सामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना भरघोस मतदान करून जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
W57510
कऱ्हाड ः पदवीधर, शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना रवींद्र चव्हाण. समोर उपस्थित मतदार.
....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.