Narendra Modi Sakal
पुणे

भाजप दक्ष, नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष

‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियानाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरिकांना चांगले आरोग्य देता यावे यासाठी भाजपने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरू करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरु झाले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची (Health) काळजी यामधून घेतली जाणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवकांनी (Swayamsevak) झोकून देऊन काम केले पाहिजे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले. (Pune News)

पुणे, पिंपरी-चिंचवड येथील भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे घरकुल लॉन्स येथे ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्यावेळी पाटील बोलत होते. वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपले, आयुर्वेद डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. तेजस्विनी अरविंद, डॉ. मनिषा जाधव, डॉ. ऐश्वर्या सुपेकर, डॉ. धनंजय जोशी, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. प्रदीप नरवणे, डॉ. शुभदा कामत, शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, डॉ. संदीप वाघ, धर्मेंद्र खंदारे, डॉ. सुनील चौहान, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, “आयुष्यमान भारतासाठी नरेंद्र मोदी आणि जे. पी. नड्डा यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य व्यवस्था मिळावे, या उद्देशाने हे अभियान सुरू केले आहे. हे अभियान गावोगावी, वाड्या-वस्त्यांमध्ये पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. या कार्यशाळेत डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. सागर पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

Pune News: सिंहगड संस्थेला पुन्हा दणका ;आणखी २५ महाविद्यालयांवर प्रशासकाची नेमणूक

SCROLL FOR NEXT