पुणे

भाजपकडून १४४ उमेदवारांची यादी जाहीर

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पश्‍चिम बंगालच्या १४४ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर या दोन्ही याद्या जाहीर करण्यात आल्या. पहिल्या यादीत पक्षाने सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष या वरिष्ठ नेत्यांना तिकीट दिले आहे. अधिकारी हे नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून भवानीपूरमध्ये त्यांचा मुकाबला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीवेळी नंदीग्राम मतदारसंघात अधिकारी यांनी १७ व्या फेरीअखेर बॅनर्जी यांचा दोन हजार मतांनी पराभव केला होता. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप यावर ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर भवानीपूर मतदार संघातून  बॅनर्जी यांनी पोटनिवडणूक जिंकली होती. भाजपने दिलीप घोष यांना बोलपूर मतदारसंघात तिकीट दिले असून अग्निमित्र पॉल यांना आसनसोल दक्षिण तर माजी खासदार स्वपन दासगुप्ता यांना रासबिहारी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत दहा महिला नेत्यांचा समावेश आहे. पश्‍चिम बंगालमध्ये यावेळी २३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT