Rohit Pawar  Sakal
पुणे

Rohit Pawar : बारामतीबरोबर राज्यातही भाजपाला पराभव स्वीकारावा लागेल - आमदार रोहित पवार

मलिदा गँग भाजपासोबत गेली असली तरीही जनता मात्र जनता ही महाविकास आघाडीच्या विचारांसोबतच आहे.

विजय जाधव

भोर(पुणे) : मलिदा गँग भाजपासोबत गेली असली तरीही जनता मात्र जनता ही महाविकास आघाडीच्या विचारांसोबतच आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबर राज्यातही भाजपाला पराभव स्विकारावा लागेल. असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

बारामतील लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त येथील हॉटेल सोनाली गार्डनमध्ये गुरुवारी (ता.२८) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादी क़ॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रविंद्र बांदल, शिवसेनेचे कुलदीप कोंडे, माजी नगरसेवक यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, मानसिंग धुमाळ, शिवसेनेचे ज्ञानेश्वर शिंदे व नारायण कोंडे, कॉग्रेसचे पोपट सुके आदी प्रमुख मान्यवरांसह आघाडीच्या घटकपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद कमी करायची आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षाबरोबर घरे फोडण्याची कामे केली आहेत. सध्या बेरोजगारी, महिलांची सुरक्षा व शेतक-यांचे प्रश्न यामुळे जनता भाजपाला धडा शिकविणार आहे.

महायुतीमध्ये हुकूशाही असून सर्व आदेश दिल्लीवरून येतात परंतु महाविकास आघाडीमध्ये लोकशाही असून चर्चा करून निर्णय घेतला जातो. पुरोगामी विचार सोडून प्रतीगामी विचारांकडे गेलेल्यांना जनताच धडा शिकविणार आहेत.

जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर हे उमेदवार उभे करून अप्रत्यक्षरित्या भाजपाला फायदा करून देतील. त्यामुळे त्यांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. बारामती मतदासंघात विजय शिवतारेंना दबाव टाकायचा असेल किंवा वाटाघाटी करायच्या असतील म्हणून त्यांचे उमेदवारीचे धोरण अवलंबले होते का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांचा बोलविता धनी कोण आहे हेदेखील लवकरच समजेल.

राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. अनंतराव थोपटे हे विचारांचे पक्के आहेत. आणि हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि मी आमदार संग्राम थोपटे यांचेही योग्य त्या वेळी मार्गदर्शन घेत असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.

भोरच्या एमआयडीसी बाबत माहिती घेवू....

भोरच्या एमआयडीसीबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु स्थानिकांचा छुपा विरोध झाल्याचे मला समजले. भोरच्या एमआयडीसीबाबत मला अधिक अभ्यास करावा लागणार आहे. आता इतिहासात जाण्यापेक्षा यापुढे एमआयडीसीसाठी एकत्रीतपणे प्रयत्न करता येतील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT