Gram Panchayat Election Results Esakal
पुणे

Gram Panchayat Election Results: पवारांच्या बारामतीत भाजपने उघडलं खातं; समान मतामुळे ईश्वरचिठ्ठीने भाजपला तारलं

बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरु आहे. बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीस सुरवात झाली आहे. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अजित पवार गटाने जास्त जागांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. दरम्यान, बारामती तालुक्यात भाजपने खातं उघडलं आहे.

बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथे भाजपचा पहिला संरपंच विजयी झाला आहे. 9 पैकी 4 जागा भाजपला मिळाल्या आहेत. सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. ईश्वरचिठ्ठी काढत भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

बारामतीत आत्तापर्यंत 22 गावांचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी 21 राष्ट्रवादीकडे आहेत तर एका गावचा सरपंच भाजपचा आहे. गावातील एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समसमान मत पडली होती, त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्याची प्रक्रियेतून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.

बारामती तालुक्यात सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी या ग्राम पंचायतीकडे लागले होते. या ठिकाणी अजित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान होते. काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT