Pune University 
पुणे

विद्यापीठात राजकीय ‘राडा’...विद्यार्थी संघटनांमधील हाणामारीनंतर दोन्ही बाजूने आक्रमक आंदोलने

सकाळ वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांत सदस्य नोंदणीवरून हाणामारी होते. गुरूवारी (ता.२) एसएफआय आणि समविचारी संघटनांच्या वतीने विद्यापीठाच्या आवारात निदर्शने करण्यात येते. तर आज विद्यापीठाच्या वसतिगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहील्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुपारी आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील आंदोलन संपल्यावर भाजप आणि अभाविपचे कार्यकर्ते परत येत असताना मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. रिफेक्ट्रीसमोर एसएफआयची सदस्य नोंदणी करणारे कार्यकर्ते दिसल्यावर आंदोलक त्यांच्यावर धाऊन गेले. त्यांनी सदस्य नोंदणी रोखली. (Latest Marathi News)

यावेळी पोलिसांनी संरक्षक कडे करून एसएफआयच्या चार कार्यकर्त्यांना संरक्षण दिले. भाजपच्या वतीने यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान गुरूवारी (ता.२) दोन्ही संघटनांच्या वतीने एकमेकांच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह मजकूर

विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी समोर आला होता. यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात आता विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठ मधील भिंतीवर पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भातील इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची घटना समोर आली, या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT