पुणे

मंत्री- नगरसेवकाचे समर्थक भिडले

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे (पुणे) : कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी (6 सप्टेंबर) कार्यकर्त्याला मारहाणीच्या घटनेवरून वाद झाले. त्यामुळे तळेगावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

दोन गटात झालेल्या मारामारीतून कल्पेश मराठे (वय 29, रा. वराळे, ता. मावळ) हा कार्यकर्ता जखमी झाला. या प्रकरणी त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारीतून आलेल्या संदीप भेगडे, अजय भेगडे, प्रतीक भेगडे, आविष्कार भेगडे यांसह अन्य सहा जणांनी लाकडी दांडके व लोखंडी गजाने कल्पेशला बेदम मारहाण केली होती. यामध्ये मराठे याच्या पायाला, हाताला व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तसेच प्रतीक भेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रतीक गाडीतून जात असताना रस्त्यावरील पाणी कल्पेशच्या अंगावर उडाले. त्यांच्यात बाचाबाची झाली. या वेळी कल्पेशने प्रतीकला बांबूने मारहाण करून त्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. याबाबत कल्पेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, कल्पेशला राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी मारहाण करून त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. सत्तेच्या माध्यमातून सुरू असलेली दादागिरी खपवून घेणार नसून, खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अप्पर पोलिस अधीक्षक रामनाथ पोफळे यांच्याकडे केली आहे. सोमाटणे फाटा येथील रुग्णालयासमोर सकाळी रास्ता रोको करण्यासाठी मोठा जमाव जमला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिस अधिकाऱ्यांसमवेत सर्व तळेगाव पोलिस ठाण्यात आले. तेथे चर्चा झाली. या वेळी अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन अप्पर पोलिस अधीक्षक पोफळे यांनी शेळके यांना दिले. 

याबाबत राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, "कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीची घटना वाईट व दुःखदायक आहे. मात्र, या वैयक्तिक भांडणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कायदा सर्वांसाठी सारखाच असून, पोलिस चौकशी करून योग्य न्याय देतील. सर्वांनी संयम व शांततेने वागून पोलिसांना सहकार्य करावे." 
---- 

राज्यमंत्री भेगडे व नगरसेवक शेळके हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधील दोन प्रबळ इच्छुक असलेल्यांमध्ये या मारहाणीच्या घटनेमुळे 'तू-तू मैं-मैं' झाले आहे. उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याने या घटनेमुळे तालुक्‍यातील पक्षीय राजकारण ढवळून निघाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT