पुणे

महापालिकेत शहर सुधारणासह चार समित्यांवर भाजपराज

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची, तर उपाध्यक्षपदी धनराज घोगरे यांची, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. श्रद्धा प्रभुणे यांची, विधी समितीच्या अध्यक्षपदी योगेश समेळ यांची, तर उपाध्यक्षपदी वीरसेन जगताप यांची, क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी विजय शेवाळे यांची, तर उपाध्यक्षपदी महेश वाबळे यांची निवड करण्यात आली. 

महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने या समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसनेही उमेदवार उभे केले होते. मात्र, महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने चारही समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद भाजपकडे राहिले.

प्रत्येक समितीत 13 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे आठ, तर राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. निवडणुकीत पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. 

नाराज शिवसेनेने पाळला युतीचा धर्म 

महापालिकेतील विषय समित्यांसह प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने डावलल्यानंतर ताठर भूमिका घेतलेल्या शिवसेनेने आता एक पाऊल मागे घेतले असून, विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपला साथ देत युतीचा धर्म पाळल्याचे शिवसेनेने दाखवून दिले. परंतु, भाजपच्या भूमिकेबाबत शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे शनिवारी पुन्हा उघड झाले. 

विषय समित्यांपैकी शहर सुधारणा किंवा महिला बालकल्याण समितीच्या मागणीवर शिवसेना ठाम होती. मात्र, शिवसेनेच्या मागणीआधीच क्रीडा किंवा विधीपैकी एका समितीचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव भाजप नेत्यांनी शिवसेनेपुढे ठेवला होता. त्यावरून नाराज झालेल्या शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे युतीच्या नेत्यांमधील मतभेद दिसून आले. त्यानंतर प्रभाग समित्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यानही या दोन्ही पक्षांत नाराजीनाट्य रंगले.

भाजपकडील 11 पैकी चार समित्या देण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली. मात्र, प्रभागांमधील ताकद दाखवून देत एका समितीचा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने नाकारला. त्यामुळे लोकसभा निवडणूक संपूनही आठवडा होण्याआधीच युतीला तडे जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना शिवसेनेच्या सदस्यांनी मतदान केल्याने महापालिका वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले, ""आम्ही युतीचा धर्म पाळला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मदत केली आहे. या पुढील काळात आम्ही भूमिकेवर ठाम असू.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT