पुणे

तरुणावर ब्लेडने वार; लग्न लावून न दिल्यास कुटुंबाला मारण्याची दिली धमकी

सकाळवृत्तसेवा

पुणे- तरुणीबरोबर माझे लग्न लावून द्या, नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सराईत गुन्हेगाराने एका तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. 

या प्रकरणी मयूर राजेंद्र शिंदे (वय 28, रा. नऱ्हे) याला पोलिसांनी अटक केली आहे. सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेत सौरभ जाधव (वय 20 रा. नऱ्हे) हा तरुण जखमी झाला असून, त्याने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभच्या नात्यातील एक मुलगी असून, तिच्याशी माझे लग्न लावून द्या, अशी मागणी मयूरने दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरी जाऊन केली. माझे लग्न लावून न दिल्यास तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मी कोणालाही सोडणार नाही, असे म्हणत मयूरने सौरभवर ब्लेडने वार केले. सहायक पोलिस निरीक्षक पी. बी. कणसे तपास करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT