शिक्रापूर : आमदार अशोक पवारांना धमक्यांच्या निषेधार्थ सणसवाडीत रास्ता रोको sakal
पुणे

आमदार अशोक पवारांना धमक्यांच्या निषेधार्थ सणसवाडीत रास्ता रोको

अशोक पवारांसह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाराला तात्काळ अटक करा

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : आमदार अशोक पवारांसह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाराला तात्काळ अटक करा म्हणत महाआघाडीच्या घटक पक्षांनी मिळून सणसवाडी (ता.शिरूर) येथे काळ्याफितीसह रास्तारोको केला. अगदी प्रातिनिधीक स्वरुपात रास्तारोको केला असला तरी तब्बल दिड तास महामार्गावर तिनही पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन आमदार पवार यांच्या पाठीशी संपूर्णपणे उभे राहत असल्याचे यावेळी जाहिर केले.

शिरुर नगरपालिकेच्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने एका निनावी पत्राद्वारे आमदार अशोक पवार व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कठोर भाषा वापरीत जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार काल उघडकीस आला. यालाच अनुसरुन आज सकाळी साडेनऊ वाजता सणसवाडी (ता.शिरूर) येथील चौकात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश ढमढेरे, तालुकाध्यक्ष वैभव यादव, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सभापती मोनिका हरगुडे आदींच्या नेतृत्वाखाली निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.

यात सर्व नेत्यांनी अशोक पवार यांच्या संपूर्णपणे पाठीशी उभे राहत असल्याचे जाहीर करीत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान अत्यंत कठोर भाषेत आरोपीवर टिका करताना कार्यकर्त्यांनी अखेर रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला व काही काळ रास्तारोको करीत संपूर्ण पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक थांबवून धरली. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांचेकडे बाजार समिती सदस्य दत्ता हरगुडे, सरपंच सुनंदा दरेकर, उपसरपंच विजयराज दरेकर, साहेबराव भंडारे अदेंचे हस्ते देण्यात आले. यावेळी पिंपळ्याचे माजी सरपंच निलेश जगताप, संजय भंडारे, राजेंद्र दरेकर, ग्रामपंचायत सदस्या स्नेहल भुजबळ, ललिता दरेकर, शशिकला सातपुते, माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे, शिवाजी दरेकर, बबुशा दरेकर, सुहास दरेकर, नवनाथ दरेकर, शिवसेनेचे अमोल हरगुडे, सुभाष दरेकर, श्याम दरेकर, निलेश दरेकर, अनिल गोटे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT