pune
pune sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात येत्या बुधवारी तालुकानिहाय रक्तदान शिबिर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. या आदेशानुसार येत्या बुधवारी (ता. २२) प्रत्येकी एक रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. भविष्यात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी सकाळी ते दहा ते सायंकाळी चार या वेळेत ही शिबिरे होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डेंगी, चिकुनगुनिया यासारखे साथीचे रोग आढळून आले आहेत. या रोगांमुळे रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेटसची संख्या कमी होते. मात्र सध्या कोरोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये आणि सामाजिक संस्थांच्यावतीने नियमितपणे घेतली जाणारी रक्तदान शिबिरे बंद आहेत. यामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू शकतो. रक्त उपलब्धतेची अडचण दूर व्हावी आणि भविष्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे याबाबतच्या आदेशात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील खासगी रक्तपेढ्यांच्या (ब्लड बॅक) माध्यमातून ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेच. यासाठी जिल्हा रुग्णालयातील शरीरविकृती शास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) डॉ. मिलिंद कुलकर्णी यांची जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी (नोडल आॅफीसर) म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर हे जिल्हास्तरीय संनियंत्रण अधिकारी असणार आहेत.

रक्तदानासाठी पात्र असणारे व्यक्ती

  1. रक्तदान करू इच्छिणारे १८ ते ६५ या वयोगटातील असावेत

  2. हिमोग्लोबीन १२.५ टक्क्याच्या आत नसावे

  3. रक्तदाता व्यक्तीचे वजन किमान ४५ किलो असावे

  4. संबंधित व्यक्ती हा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा

  5. रक्तदाब साधारण असणे अनिवार्य

  6. ताप किंवा इतर लक्षणे नसावीत

  7. मागील २८ दिवसात कोरोना झालेले नसावा

  8. रक्तदान केले असल्यास तीन महिने (पुरुष) व चार महिने (महिला) अंतर असावे

शिबिरासाठी तालुकानिहाय नियुक्त ब्लड बॅक

  1. बारामती --- ससून रुग्णालय ब्लड बॅक, पुणे

  2. भोर --- जनकल्याण रक्तपेढी, पुणे

  3. खेड --- चाकण रक्तपेढी, चाकण

  4. इंदापूर --- मुक्ताई रक्तपेढी, इंदापूर

  5. पुरंदर --- जिल्हा रुग्णालय, औंध रक्तपेढी

  6. जुन्नर --- मोरया रक्तपेढी, पुणे

  7. मावळ --- दीनानाथ मंगेशकर रक्तपेढी, पुणे

  8. मुळशी --- यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे

  9. वेल्हे --- जनकल्याण रक्तपेढी, पुणे

  10. आंबेगाव --- मोरया रक्तपेढी, पुणे

  11. दौंड --- पुणे रक्तपेढी, हडपसर

  12. शिरूर --- पीसीआय रक्तपेढी, रास्तापेठ, पुणे

  13. हवेली --- पुणे रक्तपेढी, हडपसर.

पावसाळा संपत आल्यानंतर सप्टेंबर आणि आक्टोबर या महिन्यात तापमानामध्ये वाढ होऊन, डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या आजारात रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटसची संख्या कमी होते. अशा रुग्णांना त्वरित रक्त पुरवठा करणे गरजेचे असते. रक्ताची ही गरज भागविण्यासाठी या शिबिरांचे आयोजन केले आहे.

- डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT