पुणे

मांडवगण फराटा येथे ४०७ जणांचे रक्तदान

CD

मांडवगण फराटा, ता. १८ : छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, मांडवगण फराटा व ग्रामस्थांतर्फे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माऊली मंदिर येथे झालेल्या शिबिरात ४०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ स्वप्निल गायकवाड यांनी रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते. त्यामध्ये राहुल गरूड, संजय गायकवाड व अर्जुन रंधवे हे विजेते ठरले. त्यांना स्कूटर भेट देण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विकास फराटे, आकाश सूर्यवंशी, योगेश फराटे, शाहरुख सय्यद आदींनी विशेष प्रयत्न केले. माऊली मंदिर प्रतिष्ठान, दादापाटील फराटे मित्र मंडळ, श्री वाघेश्वर लॉन्स, मनिषा कटके, प्रमोदजी पऱ्हाड यांचे सहकार्य लाभले. प्रतिष्ठानकडून सलग १३ वर्षांपासून शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, यंदाचे हे १८ वे शिबिर होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर फराटे, विश्वास ढमढेरे, बापूसाहेब शिंदे, शशिकांत दसगुडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT