रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्युब घाटात टाकणाऱ्या कंपनीला एक लाखाचा दंड Sakal
पुणे

Pune News : रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्युब घाटात टाकणाऱ्या कंपनीला एक लाखाचा दंड

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कंपनीवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर उर्वरित रक्ताच्या नमुन्यांच्या ट्युब जुन्या कात्रज घाटात टाकून देणाऱ्या एन.एम.हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक कंपनीवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. संबंधित कंपनीवर एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करीत, संबंधित जैव वैद्यकीय कचरा तत्काळ उचलण्यास भाग पाडण्यात आले.

कात्रज येथील जुन्या घाटात रक्त तपासणीच्या ट्युब भरलेली पोती उघड्यावर टाकून देण्यात होती. हा प्रकार पक्षी मित्र बाळासाहेब ढमाले यांना माहीत पडला. त्यानंतर या प्रकाराबाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित तक्रारीची गांभीर्याने दखल घेत घनकचरा विभागाचे प्रमुक संदीप कदम यांनी संबंधित कंपनीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रक्त तपासणी ट्युबवरील माहितीच्या आधारे कंपनीचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये धनकवडी येथील के.के. मार्केट परिसरातील एन.एम.हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक कंपनीने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महापालिकेने संबंधित कंपनीवर एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली. भविष्यात सार्वजनिक ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा टाकू नये, अशी सक्त ताकीद संबंधित कंपनीला देण्यात आली. त्यानंतर संबंधित कंपनीलाच त्यांनी टाकलेला जैव वैद्यकीय कचरा उचलण्यास सांगण्यात आले.

"जैव वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे हा गंभीर प्रकार आहे. संबंधित कंपनीला एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कोणी या स्वरूपाचा प्रकार केल्यास त्यांच्यावरही दंडाची कडक कारवाई केली जाईल.''

- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Gokul Election: ‘कप-बशी’ चिन्हासाठी प्रतिष्ठेची लढाई;सतेज पाटील गटाचा पहिला, त्यानंतर महायुतीचा अर्ज

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT