पुणे

बोधेगाव -दिवाळीसाठी पाच हजार,मुक्या जीवांचे काय? शेतकऱ्यांचा सवाल

CD

BOD26A04988
बोधेगाव ः येथील आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेली जनावरे.

जनावरांना जगवायचे कसे?
शेतकऱ्यांचा सवाल ः चारा छावण्यांची मागणी
उद्धव देशमुख ः सकाळ वृत्तसेवा
बोधेगाव, ता. १४ ः शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. पावसाअभावी विहिरींची पाणीपातळी खालावली असून, हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही ठप्प झाले आहे. एकीकडे शेतीत केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेला, तर दुसरीकडे जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांनी गोठ्यातील जनावरांना विक्रीसाठी बाजाराची वाट दाखवण्यास सुरवात केली आहे. बोधेगावसह पूर्व भागातील ४० गावांमध्ये जूनमध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांची उगवण आणि वाढ खुंटली. पेरणीपूर्व मशागत, नांगरणी, पाळी मारणे, बियाणे, खते, फवारणी आणि खुरपणी अशा विविध कामांसाठी शेतकऱ्यांना एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागला. मात्र, पिके हाताशी येण्यापूर्वीच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. काही ठिकाणी पिके सुकली, तर काही ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पाऊस नसल्याने हिरवा चारा उपलब्ध नाही, तर विकतचा चारा घेणेही शेतकऱ्यांना परवडत नाही. जनावरांना जगवायचे कसे, या विवंचनेतून अनेकांनी आपल्या गोठ्यातील जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात जनावरांचे दरही घसरले आहेत. लाखमोलाची जनावरे ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे चित्र आहे.
----------
४० गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या बोधेगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. यंदा खरीप हंगाम वाया गेल्याने संकट अधिक गंभीर बनले आहे. शेतकऱ्यांनी उरलेसुरले पशुधनही बाजारात विक्रीसाठी नेण्यापूर्वी शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा थेट आर्थिक मदत द्यावी.
-प्रकाश काळे, शेतकरी, बोधेगाव.
----------
पाच हजारांनी दिवाळी गोड
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. या मदतीमुळे सणासुदीला काही प्रमाणात हातभार लागला, तरी जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा डीबीटीच्या माध्यमातून ठरावीक अनुदान थेट पशुपालकांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Latest Marathi News Live Update: मुंबईतील नरिमन हाऊसची रेकी; एटीएसकडून २० वर्षीय तरुणाला अटक

Election Commission: उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार? काय आहे अपडेट?

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

SCROLL FOR NEXT