Bodies of dogs found again in Sangvi area 
पुणे

पिंपरीत कुत्र्यांच्या जीवावर उठलंय कोण? पुन्हा आढळले 4 मृतदेह

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : चार दिवसांपूर्वी सांगवी परिसरात दोन कुत्र्यांचे मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरात पुन्हा चार कुत्र्यांचे मृतदेह आढळले आहेत. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली असून प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या चार दिवासात एकूण 9 कुत्र्यांनी जीव गमावले आहेत. 

चार दिवसांपूर्वी पिंपळे गुरव परिसरात एका कुत्र्यांच्या तोंडातून फेस येऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यावेळी आजूबाजूला पाहणी केली असता आणखी एका श्वानाला पोत्यात टाकून जाळल्याचे समोर आले. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 5) सकाळी साडेआठच्या सुमारास सृष्टी चाैक परिसरात पुन्हा चार श्वान  मृतावस्थेत आढळून आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, रविवारी दगावलेल्या कुत्र्यांचे शवविच्छेदन झाले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी काळेवाडी येथेही इमारतीच्या सातव्या मजल्यावरून श्वानाला खाली फेकल्याची घटना घडली. 

दरम्यान, जीवे मारण्याच्या हेतूने श्वानांना खाद्यपदार्थांमधून विषबाधा केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरात अज्ञातांकडून भटक्या श्वानांचा छळ केला जात आहे. त्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा केली जात असल्याने श्वान दगावण्याचे प्रकार घडत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे 

जुन्नरच्या आजींची कमाल! वयाच्या ७२ वर्षी 2 दिवसात 2 किल्ले केले सर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT