विश्रांतवाडी - धानोरी रस्त्यावरील खाणीत २ बेपत्ता तरुणांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ
पुणे - मागील चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे विश्रांतवाडी येथील खाणीतील पाण्यात शनिवारी मृतदेह आढळून आले. दोन्ही तरुण एकमेकांचे मित्र होते, दरम्यान दोघांचे हि मृतदेह सापडल्याने त्यांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
विकी प्रकाश लंके (२०), सुशांत सचिन बडदे (२१, दोघेही रा. विश्रांतवाडी) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. लंके व बडदे हे दोघेही मित्र होते. ते विश्रांतवाडीतील भीमनगर परिसरात राहण्यास होते. लंके हा सराईत गुन्हेगार होता. दोघेही बुधवारी रात्री बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली होती.
दरम्यान, शनिवारी दुपारी विश्रांतवाडी परिसरातीलच एका खाणीतील पाण्यामध्ये दोघांचेही मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिस व अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले.
दोघांचाही खून झाल्याचा नातेवाईकांचा संशय
बडदे, लंके हे दोघेही चार दिवसांपूर्वीच बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोघांचे हि शनिवारी मृतदेह आढळल्याने त्यांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. शवविच्छेदनात अहवालातूनच दोघांच्या हि मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.