पुणे

मुलीचा खून करणाऱ्या आरोपीचा आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - वडगाव येथील एका हॉटेलमध्ये नवलाख उंब्रे येथील एका अल्पवयीन मुलीचा खून करून फरार झालेल्या श्रीराम सुग्रीव गिरी (वय १९, रा. तळेगाव दाभाडे) या आरोपीचा मृतदेह शुक्रवारी (ता. ६) दुपारी वराळे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीमध्ये आढळून आला. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

आरोपीने बुधवारी (ता. ४) सकाळी अकराच्या सुमारास मुलीस फूस लावून हॉटेलमध्ये आणले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ते हॉटेलमधील एका खोलीत होते. त्यानंतर हा तरुण तेथून फरार झाला होता. हॉटेल व्यवस्थापकाने खोलीत जाऊन पाहिले असता ही तरुणी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर, पोटावर व हातावर ब्लेडने वार केल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलच्या रजिस्टरवरील नोंदी व फिर्यादीवरून गिरी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेताना पोलिसांना त्याने वापरलेली दुचाकी बुधवारी रात्रीच आंबी गावाजवळील इंद्रायणी नदीच्या पुलावर आढळून आली होती. त्यामुळे मुळशी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक दोन दिवसांपासून पाणबुड्यांच्या साहाय्याने नदीमध्ये त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह वराळे गावच्या हद्दीत सापडला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT