Deathbody 
पुणे

बेपत्ता तरुणाचा मृतदेह मिळाला

किरण भदे

नसरापूर - सारोळा, ता. भोर येथील निरा नदीच्या पुला वरुन 14 जुन रोजी रात्री अचानक बेपत्ता झालेल्या पुणे येथील तरुणाचा मृतदेह आज निरा नदीत मिळाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रणव प्रदिप कुलकर्णी (वय 28 रा.धनकवडी पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार, प्रणव व त्याचे दोन मित्र निखिल दिवेकर व अंकुश माने हे तिघे एका दुचाकी वरुन 14 जुन रोजी रात्रीच्या सुमारास महामार्गा वरुन महाबळेश्वरला चालले होते. मात्र, निरा नदीच्या जवळील सातारा जिल्हा चेकपोस्टवर त्यांच्याकडे प्रवासाचा पास नसल्याने त्यांना सातारा जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आल्यावर ते परत पुणे बाजुकडे निघाले होते. यावेळी प्रणव व अंकुश असे दोघे चेकपोस्ट पासुन निरा नदीच्या पुलावरुन चालत पुणे बाजुकडे येऊ लागले व निखिल हा दुचाकी घेवुन येऊ लागला.

प्रणव व त्याचा मित्र अंकुश चालत असताना प्रणव अचानक गायब झाल्याचे अंकुशच्या लक्षात आले. त्यांने पुन्हा चेकपोस्ट वर येऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळाला नाही. यावरुन त्याने प्रणव पुला वरुन पाण्यात पडला असल्याची शंका व्यक्त केली होती. त्यानुसार ता. 15 रोजी दिवसभर राजगड व शिरवळ पोलिस तसेच मुळशी रेस्कु टिम निरा नदीच्या पाण्यात त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडु शकला नाही. आज ता. 16 रोजी पुन्हा महाबळेश्वरच्या सह्यार्दी रेस्कु टिमने शोध मोहीम सुरु केल असता पुला पासुन साधारण एक किलोमिटर अंतरावर निरा नदीच्या पाण्यात प्रणवचा मृतदेह अढळला.

शिरवळ पोलिसांनी या बाबत नोंद घेऊन शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असुन पुढील तपास शिरवळचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT