Pune Crime Esakal
पुणे

Pune Crime: शिवाजीनगर परिसरात नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; शहर परिसरात खळबळ

पुण्यातील नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुठा नदीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर परिसरात दगडी पुलाखाली हा मृतदेह आढळला असून याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील दगडी पुलाखाली आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबतची माहिती नागरीकांनी तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृतदेह पुरुष व्यक्तीचा असून त्याचे वय 55 ते 60 च्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच या व्यक्तीच्या डोक्याला मार लागलेला असून गुडघ्यालादेखील जखम झाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून ही हत्या आहे, का आत्महत्या याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT