पुणे

खडकवासला धरणाच्या पाण्यात आढळला मृतदेह; अकस्मात मृत्यूची नोंद

निलेश बोरुडे

किरकटवाडी : पुणे पानशेत रस्त्यावर असलेल्या सोनापूर (ता. हवेली) या गावाजवळ खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (ता. 5 ऑक्टोबर रोजी) कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून, नंदकुमार बबनराव पाटील (वय 67, रा.47/31ब,एफ-7, धर्म नगरी सोसायटी, तावरे कॉलनी अरण्येश्वर, पुणे-9.) असे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत हवेली पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनापूर गावचे माजी सरपंच दत्ता पवळे यांनी सोनापूर गावाजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यामध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती फोनवरून हवेली पोलिस ठाण्याला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय शेंडगे, चालक महेंद्र चौधरी व होमगार्ड रोहित देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवून दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान पाच ते सहा दिवसांपासून मृत नंदकुमार पाटील हरवले असल्याची फिर्याद नातेवाईकांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात दिलेली होती. नातेवाईकांच्या माहितीनुसार मृत नंदकुमार पाटील हे अधूनमधून घरातून निघून जात व काही दिवसांनी घरी परत येत असत. यावेळी पाच ते सहा दिवस झाले तरी पाटील घरी परत न आल्याने नातेवाईकांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन हरवले असल्याची फिर्याद नोंदवली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पुणे शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांना देण्यात आली होती. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी पाटील यांच्या नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी ससून रुग्णालयात बोलावले होते. नातेवाईकांनी मृतदेह ओळखल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह पाटील यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT