Crime esakal
पुणे

Pune Fraud : बोगस कंपन्यांकडून २० कोटी रुपयांची फसवणूक, दोघांना अटक

सीजीएसटी आयुक्तालयाकडून बनावट चलन प्रकरण उघडकीस.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट पास करणाऱ्या विविध बोगस कंपन्यांवर बनावट पावत्या जारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी पुणे-२) आयुक्तालयाच्या कर चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. या बोगस कंपन्यांनी २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील सूत्रधार असलेल्या पुण्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

सीजीएसटी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बोगस कंपन्या एका विशिष्ट समूहातर्फे केवळ कागदोपत्री चालवल्या जात होत्या. वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता फसव्या पावत्यांद्वारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या सरकारी कंत्राटदारांचाही समावेश आहे.

या प्रकरणात २० कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत सव्वातीन कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. या सर्व कटकारस्थानात या समूहाने बनावट चलन व्यवहारातील सरकारी कंत्राटदाराच्या संगनमताने बँकिंग चॅनेलचा वापर केल्याचे तपासाअंती सकृतदर्शनी पुराव्यांवरून दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT