पुणे

भरधाव बोलेरो झाडावर आदळून चौघेजण जखमी

CD

भरधाव बोलेरो झाडावर आदळली; चौघे जखमी
जयनिला हॉटेलसमोरील अपघातात वाहनाचे तीन लाखांचे नुकसान; चालकाविरुद्ध गुन्हा
सांगोला, ता. ५ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर जयनिला हॉटेलसमोर भरधाव बोलेरो पिकअपने रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडाला धडक दिली. या अपघातात चालकासह चौघे जखमी झाले. २३ ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात वाहनाचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत राहुल अशोक कोळी (वय ३६, रा. गळतगा, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांनी आज (ता. ५) सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोळी हे २२ ऑगस्ट रोजी रात्री महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून खडकलाट येथून सांगोला मार्केटकडे निघाले होते. वाहनात चालक मलिक इमाम मुलतानी, क्लीनर दीपक शंकर कोंडेकर व वीरभद्र शिवपुत्र मुगळे होते.
२३ ऑगस्ट रोजी पहाटे वाहन जयनिला हॉटेलसमोर आले असता चालक मलिक मुलतानी याने भरधाव व हयगयीने वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाहन लिंबाच्या झाडावर आदळले. या अपघातात राहुल कोळी, दीपक कोंडेकर व वीरभद्र मुगळे जखमी झाले. चालक मलिक मुलतानी यालाही दुखापत झाली.
जखमींना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दीपक कोंडेकर यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला, राहुल कोळी यांना निपाणीला, तर वीरभद्र मुगळे व चालक मलिक मुलतानी यांना चिक्कोडी येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी चालक मलिक इमाम मुलतानी याच्याविरुद्ध हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT