punaa hospital sakal
पुणे

Pune : पूना हॉस्पिटलमध्ये पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी

पूना हॉस्पिटलमध्ये पुन्हा शुक्रवारी (ता. २) बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. काल गुरुवारी मध्यरात्रीही बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षात आला होता. आज पुन्हा दुसऱ्यांदा दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची कसून तपासणी केली.

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूना हॉस्पिटलमध्ये पुन्हा शुक्रवारी (ता. २) बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. काल गुरुवारी मध्यरात्रीही बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षात आला होता. आज पुन्हा दुसऱ्यांदा दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची कसून तपासणी केली. परंतु बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही.

नवी पेठेतील पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांसह बाँम्ब शोधक व नाशक (बीडीडीएस) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ‘बीडीडीएस’च्या पथकाकडून परिसराची तपासणी करण्यात आली. दोन तास रुग्णालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे दूरध्वनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी पुन्हा बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांमध्ये घबराट पसरली होती.

पुण्यासह मुंबईतही बॉम्बची धमकी

पोलिस नियंत्रण कक्षाला काल गुरुवारी ज्या क्रमांकावरून बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आला होता, त्याचा क्रमांकावरून पुन्हा शुक्रवारी दूरध्वनी आला आहे. त्याच क्रमांकावरून मुंबईतही काही ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे दूरध्वनी केल्याचे समोर आले आहे. नियंत्रण कक्षाला निनावी दूरध्वनी करणाऱ्या त्या व्यक्तीचा सायबर पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त वसंत कुंवर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

SCROLL FOR NEXT