GHR26A09611
संगमनेर ः खांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट देताना श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिक्षक आणि मान्यवर.
पुस्तकांच्या भेटीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला दिशा
श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानचा २४७ वा उपक्रम
संगमनेर, ता. २५ ः विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि शालेय ग्रंथालय अधिक समृद्ध व्हावे, या उद्देशाने श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने खांडगाव (ता. संगमनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ११५ पुस्तकांची भेट देण्यात आली. प्रतिष्ठानचा हा २४७ वा उपक्रम होता.
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे चं. का. देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप वाकचौरे, ॲड. सदाशिव थोरात, उत्तम देशमुख आणि पराजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक गुंजाळ होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या कमलताई अरगडे, समितीचे सदस्य सुनील रुपवते यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी उपक्रमशील शिक्षक व लेखक अशोक शेटे यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. मुख्याध्यापिका निलिमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
.................
सामाजिक बांधिलकी जपणारे देशमुख
श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चं. का. देशमुख सातत्याने निःस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहेत. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही ते विशेष प्रयत्नशील असतात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्या शिक्षणाला आधार देणे असे विविध उपक्रम राबविले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.