Kharichya Vata Book Sakal
पुणे

दहा भाषांत होणार ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकाचा अनुवाद

ज्येष्ठ लेखक ल. म. कडू लिखित ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकाचा आता दहा भाषांमध्ये अनुवाद होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

ज्येष्ठ लेखक ल. म. कडू लिखित ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकाचा आता दहा भाषांमध्ये अनुवाद होणार आहे.

पुणे - ज्येष्ठ लेखक ल. म. कडू लिखित ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकाचा आता दहा भाषांमध्ये अनुवाद होणार आहे. २०१७ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले हे पुस्तक साहित्य अकादमीतर्फेच आता अनुवादित करण्यात येत आहे. याबाबतचे पत्र साहित्य अकादमीतर्फे नुकतेच कडू यांना प्राप्त झाले.

या पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजीसह डोंगरी, कोकणी, मैथिली, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बोडो आणि संताली या भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र साहित्य अकादमीतर्फे कडू यांना आले आहे. ‘कुमार गटातील मुलांच्या भावविश्वाची आपल्याकडे फारशी दखल घेतली जात नाही, अशी मला खंत होती. त्यातूनच हे पुस्तक आकाराला आले. आता दहा भाषांमध्ये त्याचा अनुवाद होत असल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत माझे म्हणणे पोहोचेल, याचा मनस्वी आनंद झाला आहे. तसेच, एक मराठी पुस्तक यानिमित्ताने राष्ट्रीय स्तरावर जात असल्यानेही आनंद द्विगुणित झाला आहे’, अशी भावना ल. म. कडू यांनी व्यक्त केली.

हे पुस्तक किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित आहे. एका निसर्गरम्य खेड्यातील दोन किशोरवयीन मित्र आणि त्यांनी पाळलेली खार, यांची अलवार कथा यात सांगण्यात आली आहे. ती खार त्या दोघांना निसर्गातल्या विविध गोष्टी अनुभवायला शिकवते. नंतर मात्र गावात धरण बांधले जात असल्याने त्या मुलांना कुटुंबासह गाव सोडावे लागते, पण ती खार तिथेच राहते. उमलत्या वयातल्या मुलांचे भावविश्व नेमकेपणाने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून कडू यांनी केला आहे. राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT