devendra fadnavis  Sakal
पुणे

Devendra Fadnavis : मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला असताना पुस्तक खरेदी कौतुकास्पद

पुणे हे विद्येचे माहेरघर आहेच. पण ज्ञान संपादन करण्याची जी प्रेरणा पुण्यात पाहायला मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे हे विद्येचे माहेरघर आहेच. पण ज्ञान संपादन करण्याची जी प्रेरणा पुण्यात पाहायला मिळाली. मोबाईल, संगणाकामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्याची तक्रार पालक सातत्याने करत असतात. पण हीच मुले पुस्तक महोत्सवात मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करत आहेत, ही कौतुकाची गोष्ट. अशा प्रकारेच महोत्सव इतर ठिकाणीही भरविले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आयोजित केला आहे. यास फडणवीस यांनी आज भेट दिली. त्यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, न्यासाचे अध्यक्ष युवराज मलीक, राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘या उत्सवासाठी जी टीम तयार झाली त्यातून हा महोत्सव यशस्वी झाला आहे. कोणत्याही समाजाचा आरसा लोक कोणती पुस्तक वाचत त्यावरून ठरत असतो.पुस्तक म्हणजे पान नाहीत, तर त्यांच्या वाचनातून विचारांच्या कक्षा रुंदावतात.

ऐतिहासिक पुस्तकांमधून आपण कोण आहोत, आपली संस्कृती काय आहे, आपल्या स्वातंत्र्याचे मोल काय आहे? हे आपल्याला समजते. समाजात पैशाच्या खजिन्यापेक्षा विचारांचा खजिना किती मोठा हा एक मानक आहे.

ज्या वेळी नालंदा विद्यापीठ जाळण्यात आले, तेव्हा २१ दिवस प्रयत्न करूनही तेथील ग्रंथसंपदा नष्ट होऊ शकली नव्हती. तेथील ज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण ज्ञान नष्ट झाले नाही. त्यामुळे अशा प्रकारचे ग्रंथ महोत्सव समाजाच्या आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे साधन आहे. पुण्यातील पुस्तक महोत्सव यशस्वी झाला आहे. यापुढे असा महोत्सव नाशिक, नागपूरसह इतर ठिकाणी आयोजित करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT