bopdev ghat rape case accused sakal
पुणे

Bopdev Ghat Crime : पोलिसांना अद्याप धागेदोरे सापडेनात

बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचाराच्या घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींबाबत अद्याप धागेदोरे सापडलेले नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचाराच्या घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींबाबत अद्याप धागेदोरे सापडलेले नाहीत. आरोपींचा शोध घेण्यासाठी बोपदेव घाटात यापूर्वी लूटमार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.

कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गुरुवारी (ता. ३) रात्री महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. गुन्हे शाखेसह पोलिसांच्या २५ पथकांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. पुणे पोलिसांसह अन्य जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांनाही तपासासाठी पाचारण केले आहे. सुमारे तीनशेहून अधिक पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी पुण्यासह सोलापूर, सातारा आणि इतर जिल्ह्यांतील दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी केली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीसह तिच्या मित्राने दिलेल्या माहितीवरून आरोपींचे रेखाचित्रे तयार केली आहेत. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि त्या घटनेच्या कालावधीतील मोबाइलधारकांची माहिती एकत्रित केली आहे. त्याआधारे तपासात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तसेच, खबऱ्यांकडून माहिती गोळा करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

तीन संशयित आरोपींचे वर्णन

आरोपींपैकी एका तरुणाचे वय सुमारे २५ वर्षे असून, त्याचा वर्ण सावळा, मध्यम बांधा आहे. जिन्स पॅंट, शर्ट, पायात चप्पल आणि काळ्या रंगाचे जॅकेट असून, बोली भाषा मराठी आहे. दुसऱ्या आरोपीचे वय सुमारे ३० वर्षे असून, वर्ण सावळा, जिन्स पॅंट, पूर्ण बाह्यांचा शर्ट, करड्या रंगाचे स्वेटर परिधान केले होते. दाढी व मिशी वाढलेली असून, तो हिंदी भाषा बोलत होता. तर तिसऱ्या आरोपीचे वय सुमारे २५ वर्षे आहे. वर्ण सावळा, जिन्स पॅंट, लेदर जॅकेट परिधान केले असून, त्याची बोलीभाषा मराठी आहे.

अशा वर्णनाच्या आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. आरोपींबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर (मोबाईल क्रमांक ८६९१९९९९८९), पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील (मोबाईल ९९२२००८७६८), गुन्हे शाखेतील युनिट पाचचे पोलिस निरीक्षक युवराज हांडे (मोबाईल ९३०७५४५०४५) किंवा कोंढवा पोलिस ठाण्यातील ०२०-२६९३०७८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT