Crime sakal
पुणे

Pune Crime : बोपदेव घाट तरुणी लैंगिक अत्याचार प्रकरण; तीनशेहून अधिक पोलिस कर्मचारी आरोपींच्या मागावर

बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींचा पुणे पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींचा पुणे पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी इतर जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले असून, तीनशेहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींच्या मागावर आहेत.

बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (ता. ३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयीन तरुणी मित्रासमवेत फिरण्यास गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत बांबूने मारहाण केली. त्यानंतर तिघांनी तरुणाला शर्ट आणि बेल्टने बांधून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.

‘पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह विविध तपास पथके आरोपींचा शोध घेत आहेत. त्यासाठी अन्य जिल्ह्यांतील काही सक्षम पोलिस अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात येत आहे. तीनशेहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत,’’ अशी माहिती पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

या प्रकरणात आत्तापर्यंत दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन आरोपींची रेखाचित्रे तयार केली आहेत. पुणे पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

खासगी सायबर तज्ज्ञांची मदत -

पोलिसांनी घटनेच्या कालावधीत बोपदेव घाटातून प्रवास केलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित केले आहे. या सर्व माहितीच्या आधारे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. तसेच, खासगी सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत असल्याचे पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT