पुणे

बोरामणी तिहेरी खून खटल्यात दोघांना न्यायालयातून जामीन

CD

बोरामणी तिहेरी खून खटल्यात
दोघांना न्यायालयातून जामीन

सोलापूर, ता. १० : बोरामणीतील वडिलोपार्जित शेती व २५ लाख रुपयांच्या कारणातून दिरानेच विधवा वहिनी आणि तिच्या दोन्ही मुलांचा खून केला होता. या तिहेरी खून खटल्यातील संशयित आरोपी सचिन शिवाजी वाघमारे व सूरज महादेव मोरे यांचा जामीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी मंजूर केला आहे.
वडिलोपार्जित जमिनीची वाटणी आणि हातउसने दिलले २५ लाख रुपये मागणाऱ्या वहिनीचा व तिच्या दोन्ही मुलांचा दिरानेच खून केला होता. यात मुख्य संशयित आरोपी शंकर म्हेत्रे याच्यासह त्याची दोन्ही मुले, पत्नी, मेव्हणा व त्याच्या हॉटेलमधील कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी मृत गायत्री यांचा भाऊ दिलीप विश्वनाथ चांदोरे यांनी सोलापूर तालुका पोलिसांत फिर्याद दिली होती. संशयितांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यातील संशयित सूरज मोरे व सचिन वाघमारे यांनी अ‍ॅड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी ॲड. न्हावकर यांनी ‘फिर्याद दाखल करतेवेळी प्रस्तुत आरोपींनी मुख्य आरोपी शंकर ऊर्फ पप्पू मस्के यास मदत केली व दोषारोपपत्रात मुख्य आरोपीस पळून जायला मदत केल्याचा विसंगत पुरावा दाखवून पोलिसांनी ठोस पुरावा आणलेला नाही’ असे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दोन्ही संशयितांचा जामीन मंजूर केला. यात संशयितातर्फे अ‍ॅड. न्हावकर, अ‍ॅड. राहुल रूपनर, अ‍ॅड. मीरा पाटील, ॲड. शिवरत्न माने यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

Marathi News Live Updates : कोलंबियात जोरदार भूकंपाचे धक्के, तीव्रता ७.४ रिश्टर स्केल

Tiranga Rally : 'तिरंगा रॅली’ निमित्त डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल

SCROLL FOR NEXT