पुणे

कॅम्पस ः सातारा

CD

कॅम्पस ः सातारा

बोर्डो मिश्रण निर्मितीचे प्रात्यक्षिक
-----------------
पुसेगाव, जि. सातारा ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथील कृषिकन्यांनी बोर्डो मिश्रण व बोर्डोपेस्ट निर्मितीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी फळबाग व विविध पिकांमध्ये बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना बोर्डोमिश्रण तयार करण्याची योग्य पद्धत, आवश्यक साहित्य, मिश्रणाचे अचूक प्रमाण, वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. कमी खर्चात प्रभावी रोग व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण उपयुक्त असल्याचे यावेळी कृषिकन्यांनी सांगितले.
कृषिकन्या ऋतुजा पाटील, अनिशा अनपट, सिद्धी गायकवाड, स्नेहल घोंगे, फिलिता गावित, प्रगती जाधव व कोमल गिऱ्हे यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. या उपक्रमासाठी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी व संचालक विलास चौधरी यांच्यासह प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे, विषयतज्ज्ञ प्रा. जाधव व कार्यक्रम अधिकारी डॉ. शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ः
पुसेगाव, जि. सातारा ः बोर्डो मिश्रण निर्मितीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देताना कृषिकन्या.PNE26W41779

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena : “अरे ये ना...." सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये राडा, राऊत-म्हस्केंमध्ये जुंपली! अनिल देसाई तर... VIDEO पाहा

Fertilizer Rationing: युरिया, डीएपीचे होणार रेशनिंग; रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी बंधनकारक

'तारिणी'मध्ये ऑपरेशन तिरंगा! अभिनेत्रीचा लूकही बदलला, मालिकेत होणार गाजलेल्या अभिनेत्याची एंट्री; प्रोमो व्हायरल

Marathi News Live Updates : संसदेचं कामकाज चालू द्या, मी सगळ्यांचं ऐकेन आणि उत्तर देईन : अमित शहा

Gokul Milk Sangh election : ‘गोकुळ’बाबत सर्कीट बेंचमध्ये मोठा निर्णय; अवसायनातील १९३ दूध संस्थांना मतदान अधिकार; हसन मुश्रीफ, सतेज पाटलांना थेट फायदा?

SCROLL FOR NEXT